व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! घरात डांबून सलग 9 दिवस अल्पवयीन मुलीवर बलात्कार

झारखंड : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीला 9 दिवस घरात डांबून बलात्कार केला आहे. या मुलीने आरोपीच्या ताब्यातून कशीबशी आपली सुटका करून पोलिसांत धाव घेतली आणि आपल्याबाबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला शोधून त्याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
झारखंडमध्ये पीडित मुलगी आपल्या मावशीकडे राहण्यास आली होती. एकदा हि मुलगी नदीवर पोहोण्यासाठी गेली असता तिथे फिलीप मुर्मु नावाच्या तरुणाने तिचे अपहरण करून तिला जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाहीतर त्याने पीडित मुलीला गाडीतून आपल्या गावी नेले. त्याने गावात त्याने भाड्याने घर घेतले होते. या घरात त्याने पीडित मुलीला डांबून तिच्यावर 9 दिवस बलात्कार केला.

एक दिवस फिलीप बाहेर गेला होता. याच संधीचा फायदा घेऊन पीडित मुलीने आपली सुटका करून घेतली आणि पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तसेच पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे.