Gold Price :सोन्याच्या किंमतीत झाला मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी नवीन किंमत तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून त्यामुळे देशभरातील सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लग्नाच्या वेळी नातेवाईकांना देण्यासाठी प्रत्येकाला सोने-चांदी खरेदी करायची असते. त्यातच आता सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उलटसुलट बदल झाल्याने खरेदीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आता फार उशीर करू नका, कारण सोने त्याच्या सर्वोच्च पातळीच्या किंमतीवरून 5,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सध्या सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम मागे 2980 रुपयांची घट झाली आहे तर चांदी 10664 रुपये प्रति किलोने स्वस्त झाले आहे. त्यानुसार सोन्याला 53,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68,000 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. सराफा बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,460 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,380 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,460 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,850 रुपये
पुणे – 49,880 रुपये
नागपूर – 49,880 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,380 रुपये
पुणे -54,460 रुपये
नागपूर – 54,460 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday Daily Price Change
1 GRAM Rs 4988.00 0 %
8 GRAM Rs 39904 0 %
10 GRAM Rs 49880 0 %
100 GRAM Rs 498800 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday Daily Price Change
1 GRAM Rs 5446.00 0 %
8 GRAM Rs 43568 0 %
10 GRAM Rs 54460 0 %
100 GRAM Rs 544600 0 %