हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदी देखील महागली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 277 रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्या दरात 246 रुपयांची वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला (8 ते 12 ऑगस्ट) 24 कॅरेट सोन्याचा दर 52,184 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 52,461 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 58,106 रुपयांवरून 58,352 रुपये प्रति किलो झाली.
हे लक्षात ठेवा कि, IBGA कडून जारी केल्या जाणाऱ्या किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या जोडण्याआधीच्या आहेत. IBGA द्वारे जारी केले जाणारे दर देशभरात सार्वत्रिक आहेत. मात्र या किंमतींमध्ये GST चा समावेश नाही. Gold Price
गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या दरात किती बदल झाला ??? (Gold Price)
08 ऑगस्ट 2022- 52,184 रुपये प्रति 10 ग्रॅम
ऑगस्ट 09, 2022 – बाजार सुट्टी
10 ऑगस्ट 2022- 52,348 रुपये प्रति 10 ग्रॅम
11 ऑगस्ट 2022- 52,460 रुपये प्रति 10 ग्रॅम
12 ऑगस्ट 2022- रुपये 52,461 प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीच्या दरात किती बदल झाला ??? (Silver Price)
08 ऑगस्ट, 2022- रुपये 58,106 प्रति 10 किलो
ऑगस्ट 09, 2022 – बाजार सुट्टी
10 ऑगस्ट 2022- रुपये 58,444 प्रति 10 किलो
11 ऑगस्ट 2022- रुपये 58,700 प्रति 10 किलो
12 ऑगस्ट 2022- रुपये 58,352 प्रति 10 किलो
सोन्यावरील आयात शुल्कात झाली वाढ
अलीकडेच केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली आहे. यावेळी आयात शुल्क 7.5% वरून वाढवून 12.5% करण्यात आले आहे. देशातील सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलले गेले आहे. Gold Price
हे पण वाचा :
स्वस्तात सोने खरेदीची संधी !!! RBI कडून Sovereign Gold Bond योजनेची दुसरी सीरीज जाहीर
Rakesh Jhunjhunwala यांच्या निधनाने आर्थिक जगतात शोककळा !!! अनेक दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Central Bank Of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, आता किती फायदा होणार ते पहा !!!
Rakesh Jhunjhunwala यांची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात होती ते पहा !!!
Axis Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केले बदल, आता किती रिटर्न मिळेल ते पहा