हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. त्याचबरोबर चांदीचे दर देखील खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 474 रुपयांची घट दिसून आली तर चांदीच्या किंमतीत 1,978 रुपयांनी घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (11 ते 15 जुलै) 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,877 होती, मात्र शुक्रवारपर्यंत ती 50,403 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 56,745 रुपयांवरून 54,767 रुपये प्रति किलोवर आला. Gold Price
इथे हे लक्षात घ्या की, IBGA कडून जारी करण्यात आलेल्या या किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत मात्र या किमतींमध्ये GST जोडली गेलेली नाही. Gold Price
गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किंमतीत किती बदल झाला ???
11 जुलै 2022- 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅम
12 जुलै 2022- 50,878 रुपये प्रति 10 ग्रॅम
13 जुलै 2022- 50,800 रुपये प्रति 10 ग्रॅम
14 जुलै 2022- 50,565 रुपये प्रति 10 ग्रॅम
15 जुलै 2022- 50,403 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीच्या किंमतीत किती बदल झाला ???
11 जुलै 2022- रुपये 56,745 प्रति 10 किलो
12 जुलै 2022- रुपये 56,097 प्रति 10 किलो
13 जुलै 2022- रुपये 56,074 प्रति 10 किलो
14 जुलै 2022- रुपये 55,685 प्रति 10 किलो
15 जुलै 2022- रुपये 54,767 प्रति 10 किलो
सोन्यावरील आयात शुल्कात वाढ
केंद्र सरकारकडून नुकतेच सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता आयात शुल्क 7.5% वरून 12.5% झाले आहे. सरकारने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे देशातील सोन्याच्या किंमती वाढतील. देशातील सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Gold Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
Axis Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा
IRCTC : सावधान !!! रिफंडच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून केली जात आहे फसवणूक
YES Bank च्या ग्राहकांना मुदतीआधी FD बंद केल्यास द्यावा लागणार जास्त दंड !!!
PM Kisan च्या KYC सहित 31 जुलैपर्यंत पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामे !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!