Gold Price : गेल्या आठवड्याभरात सोने महागले तर चांदीची चमक पडली फिकी, नवीन वर्षात काय होईल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ तर चांदी मात्र स्वस्त झाल्याचे दिसून आले आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 424 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरात 461 रुपयांची घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (2 जानेवारी ते 6 जानेवारी) 24 कॅरेट सोन्याचा दर 55,163 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 55,587 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्ध चांदीची किंमत 68,349 रुपयांवरून 67,888 रुपये प्रति किलोवर आली आहे. Gold Price

Gold, silver price today, November 6: Silver outshines gold on Saturday

इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price

Gold Price Weekly: Sudden change in gold prices this week, what is the price of 24 carat gold? – Gold Price Weekly know the rate of 19 to 23 December

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)

2 जानेवारी 2022 – 55,163 रुपये प्रति 10 ग्रॅम
3 जानेवारी 2022 – 55,581 रुपये प्रति 10 ग्रॅम
4 जानेवारी 2022 – 56,142 रुपये प्रति 10 ग्रॅम
5 जानेवारी 2022 – 55,796 रुपये प्रति 10 ग्रॅम
6 जानेवारी 2022 – 55,587 रुपये प्रति 10 ग्रॅम

Designer Jewelry | Artisan Jewelry | Roma Jewelry

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)

2 जानेवारी 2022 – 68,349 रुपये प्रति किलो
3 जानेवारी 2022 – 69,227 रुपये प्रति किलो
4 जानेवारी 2022 – 69,371 रुपये प्रति किलो
5 जानेवारी 2022 – 67,678 रुपये प्रति किलो
6 जानेवारी 2022 – 67,888 रुपये प्रति किलो

वाणिज्य मंत्रालयाने दिला सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा सल्ला

वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री हा निर्णय घेऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे निर्यातीला चालना देण्याबरोबरच देशात रत्ने आणि दागिन्यांच्या उत्पादनात देखील वाढ होईल. हे लक्षात घ्या कि, या वर्षी जुलैमध्ये केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के केले होते. Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/

हे पण वाचा :
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट