हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : विक्रमी उच्चांक मोडल्यानंतर सोने झपाट्याने घसरु लागले आहे. सोन्याच्या किंमतींत झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी चालून आली आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह आणि बहुतेक युरोपियन सेंट्रल बँकांनी व्याजदरात केलेली वाढ आणि डॉलर 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्याने सोन्याच्या किंमतींत मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 58,847 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. MCX वर एप्रिल 2023 साठीच्या सोन्याचे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट 56,560 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाले, जे त्याच्या ताज्या विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 2,300 रुपयांनी खाली आहे.
सोन्यासाठी महत्त्वाचे असतील हे स्तर
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, यूएस फेड आणि बहुतेक युरोपीय मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढीची भूमिका घेतल्याने डॉलरची मागणी वाढली. ज्यामुळे यूएस डॉलर गेल्या 10 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीला 1,860 डॉलरच्या पातळीवर मजबूत सपोर्ट मिळाला आहे. त्याचप्रमाणे, देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 56,500 च्या पातळीवर मजबूत सपोर्ट कायम ठेवला आहे. आता तो 57,700 पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. Gold Price
व्याजदर कमी झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्केट एक्सपर्ट असलेल्या सुगंधा सचदेवा म्हणाल्या की,” सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होण्यामागे काही कारणे आहेत. सध्या यूएस मध्यवर्ती बँकेने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात 25 बेस पॉईंट्सने वाढ केली. याशिवाय युरोपातील मध्यवर्ती बँकांनीही याबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन डॉलरकडे व्याजदरात फारशी वाढ न झाल्याने गुंतवणुकीचा ओघ वाढला. Gold Price
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ कमोडिटी रिसर्च एनालिस्ट निरपेंद्र यादव म्हणाले कि, “यूएस फेडने 25 बेसिस पॉइंट्सची दरवाढ केल्यामुळे सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 58,800 रुपये तर चांदी 72,700 रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या व्याजदरांच्या कमालीच्या अनिश्चिततेमुळे या आठवड्याच्या अखेरीस डॉलर निर्देशांकात वाढ झाली. ज्यामुळे सोन्याने नफा बुकींग करण्यास सुरुवात केली. मध्यवर्ती बँकांकडून वारंवार होणाऱ्या या दर वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव आला आहे. मात्र अलीकडील सुधारणांनंतर सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. Gold Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :
हे पण वाचा :
Gold Price : आठवड्याभरात सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
LIC च्या पॉलिसीमधील नॉमिनी बदलण्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या
Multibagger Stock : अवघ्या 2 वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
MS Dhoni दिसणार चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ
आता WhatsApp वर मिळवा LIC पॉलिसीशी संबंधित प्रत्येक माहिती, घरबसल्या उपलब्ध होणार ‘या’ सेवा