… जेव्हा मुशर्रफ यांनी गांगुलीला विचारलं, धोनीला कुठून आणलंत? दादाच्या उत्तराने झाली बोलती बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. दुबईतील रुग्णालयात मुशर्रफ यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणाच्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या मुशर्रफ यांना क्रिकेटचे सुद्धा वेड होते.भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जेव्हा-जेव्हा गेला तेव्हा मुशर्रफ यांनी महेंद्रसिंग धोनीचे कायम कौतुक केलं. एकदा एका सामन्यानंतर त्यांनी धोनीला कुठून आणलं? असा प्रश्न तत्कालीन भारतीय कर्णधार सौरव गांगुली याला केला होता त्यावर गांगुलीने सडेतोड उत्तर देत मुशर्रफ यांची बोलती बंद केली होती. याबाबतचा किसा स्वतः गांगुलीने सांगितला होता.

2006 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानला गेला. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीही भारतीय संघात होता. धोनी पहिल्यांदाच पाकिस्तानला गेला होता. लांब केसाच्या धोनीने या दौऱ्यात आपल्या स्टाईलने आणि धडाकेबाज बॅटिंगने त्यावेळी सर्वांची मने जिंकली आणि तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यावेळी मुशर्रफ यांनी सौरव गांगुलीला विचारलं कि तुम्ही धोनीला नक्की कुठून आणलं? त्यावर दादाने उत्तर देताना म्हंटल कि ‘वाघा बॉर्डर वरून….’  तो वाघा बॉर्डर जवळ फिरत होता आणि आमच्या टीमने त्याला भारताच्या कॅम्प मध्ये सामील करून घेतलं असं उत्तर गांगुलीने देताच मुशर्रफ शांत बसले.

लाहोरमधील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यानंतरचा हा किस्सा आहे त्यावेळी धोनीने 46 चेंडूत नाबाद 72 धावा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. धोनीच्या या खेळीच्या जोरावर भारताने २८९ धावांचा पाठलाग करताना सामना जिंकला. त्या सामन्यात धोनीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.