Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजची किंमत पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया- युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात मंदी आली आहे. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली. सोने 52 हजारांच्या जवळ आले आहे. यूएस ट्रेझरीचे व्याजदर वाढल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सोन्यामधून पैसे काढून घेतले आहेत.

बुधवारी सकाळी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या फ्युचर्सची किंमत प्रति 10 ग्रॅम 52,383 रुपये झाली. यामध्ये 0.69 टक्क्यांनी घट झाली तसेच चांदीही 69 हजारांच्या खाली आली. सकाळच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचा भाव 68,203 रुपये प्रतिकिलो होता. आज चांदीच्या फ्युचर्सची किंमत 0.82 टक्क्यांनी घसरली.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -54,620 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,380 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,650 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 49,150 रुपये
पुणे – 49,180 रुपये
नागपूर – 49,180 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 54,620 रुपये
पुणे -53,650 रुपये
नागपूर – 53,650 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4988.00 Rs 4988.00 0 %
8 GRAM Rs 39904 Rs 39904 0 %
10 GRAM Rs 49880 Rs 49880 0 %
100 GRAM Rs 498800 Rs 498800 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5446.00 Rs 5446.00 0 %
8 GRAM Rs 43568 Rs 43568 0 %
10 GRAM Rs 54460 Rs 54460 0 %
100 GRAM Rs 544600 Rs 544600 0 %

Leave a Comment