Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार, आजचा सोन्याचा भाव किती आहे ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सोमवार, 27 डिसेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय सराफा बाजाराचा कल पाहता, देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. आज सकाळी सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या दरात घसरण झाली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 9.26 वाजता, सोन्याचे वायदे 99 रुपये किंवा 0.21% ने वाढले आणि पिवळा धातू 48,218 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याचा सरासरी भाव 48,179 रुपये होता. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात त्याचा बंद 48,119 रुपये होता.

सराफा बाजारात आज सोन्या-चांदीमध्ये संमिश्र कल दिसून येत असून हा क्रम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. सोन्याचे भाव मर्यादित मर्यादेत ट्रेड करत असून गेल्या आठवड्यात चांदीमध्ये दिसलेली तेजी आज गायब झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही सोने आणि चांदी संमिश्र भावाने ट्रेड करत आहेत. सोन्यामध्ये सुमारे 1 टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे. जागतिक बाजारात सोने 0.97 टक्क्यांच्या वाढीसह 1809.09 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, कोमेक्सवर 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह चांदी 22.75 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,420 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,950 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,310 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,310 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,310 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,310 रुपये
पुणे – 46,420 रुपये
नागपूर – 47,310 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,310 रुपये
पुणे – 48,950 रुपये
नागपूर -48,310 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4642.00 Rs 4641.00 -0.022 %⌄
8 GRAM Rs 37136 Rs 37128 -0.022 %⌄
10 GRAM Rs 46420 Rs 46410 -0.022 %⌄
100 GRAM Rs 464200 Rs 464100 -0.022 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4895.00 Rs 4894.00 -0.02 %⌄
8 GRAM Rs 39160 Rs 39152 -0.02 %⌄
10 GRAM Rs 48950 Rs 48940 -0.02 %⌄
100 GRAM Rs 489500 Rs 489400 -0.02 %⌄

Leave a Comment