Gold Price : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवीन दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील नरमाईमुळे शुक्रवारी भारतीय बाजारातही सोने-चांदीच्या किमती घसरल्या. सोन्याचा वायदा भाव 53 हजार रुपयांच्या खाली आला.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 9.53 वाजता सोन्याचा वायदा 338 रुपयांनी घसरून 52,901 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा वायदाही 70 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. MCX वर, चांदीचा दर 441 रुपयांनी कमी झाला आणि तो प्रति किलो 70,030 रुपये विकला गेला.

जागतिक बाजारातही भाव घसरले
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीचे दर खाली आले आहेत. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत $8.50 ने घसरून $1,991.90 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील $ 0.12 ने घसरली आहे. सकाळच्या ट्रेडिंगमध्ये चांदीचा दर 26.12 डॉलर प्रति औंस होता.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,630 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,580 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,630 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,200 रुपये
पुणे – 48,250 रुपये
नागपूर – 48,280 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,580 रुपये
पुणे – 52,630 रुपये
नागपूर – 52,630  रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4825.00 Rs 4983.00 3.171 %⌃
8 GRAM Rs 38600 Rs 39864 3.171 %⌃
10 GRAM Rs 48250 Rs 49830 3.171 %⌃
100 GRAM Rs 482500 Rs 498300 3.171 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5263.00 Rs 5436.00 3.182 %⌃
8 GRAM Rs 42104 Rs 43488 3.182 %⌃
10 GRAM Rs 52630 Rs 54360 3.182 %⌃
100 GRAM Rs 526300 Rs 543600 3.182 %⌃

Leave a Comment