Gold Price : सोने-चांदी झाले स्वस्त, आज सोन्याचा भाव किती आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 82 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणजेच 0.17 टक्क्यांच्या घसरणीसह आज सकाळी 9.02 वाजता सोने 49,210.00 रुपयांवर आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव 265.00 रुपयांनी घसरला आहे. चांदी 0.40 टक्क्यांनी स्वस्त होऊन 66,360.00 वर ट्रेड करत आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉट गोल्डच्या किमतीसह सोन्याच्या किमती मजबूत आहेत. ते म्हणाले की बुधवारी ते 0.37 टक्क्यांनी वाढून $1,857 प्रति औंस वर ट्रेड करत होते. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47510 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50840 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49480 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49480 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48480 रुपये
पुणे – 50840 रुपये
नागपूर – 48480 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49480 रुपये
पुणे – 50850 रुपये
नागपूर – 49480 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4752.00 Rs 4752.00 0 %
8 GRAM Rs 38016 Rs 38016 0 %
10 GRAM Rs 47520 Rs 47520 0 %
100 GRAM Rs 475200 Rs 475200 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

 

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5085.00 Rs 5085.00 0 %
8 GRAM Rs 40680 Rs 40680 0 %
10 GRAM Rs 50850 Rs 50850 0 %
100 GRAM Rs 508500 Rs 508500 0 %

Leave a Comment