Gold Price : सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, आजचे दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील चढउतारामुळे गुरुवारी भारतीय बाजारातही सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचा दर आज 51 हजारांच्या खाली आला. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 9.10 वाजता 24-कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 47 रुपयांनी घसरून 50,906 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. याआधी सोन्याचा भाव 50,906 रुपयांवर उघडून स्थिर राहिला. सोने सध्या विक्रमी पातळीपेक्षा 4,700 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.

कोरोना महामारीच्या काळात सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये, शेअर बाजारातील तीव्र घसरणीमुळे, सोन्याची मागणी वाढली होती आणि त्याचा दर 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता.

चांदीची मोठी घसरण, भाव 67 हजारांच्या खाली
गुरुवारी MCX वर चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आणि भाव 67 हजारांच्या खाली आले. सकाळी 9.10 वाजता चांदीचा भाव 537 रुपयांनी घसरून 66,869 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीही विक्रमी पातळीवरून सुमारे 6 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. एक दिवसापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली होती, मात्र आज पुन्हा घसरणीचे वातावरण आहे.

जागतिक बाजारपेठेत किंमतीत वाढ
जागतिक बाजारातही सोन्याचे दर खाली आले आहेत. येथे सोन्याची स्पॉट किंमत 1,926.95 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे तर चांदीची किंमत देखील 1.39 टक्क्यांनी घसरली आहे. जागतिक बाजारात चांदीची स्पॉट किंमत 24.76 डॉलर प्रति औंसवर आली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,030 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,980 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,030 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,650 रुपये
पुणे – 47,700 रुपये
नागपूर – 47,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,980 रुपये
पुणे – 52,030 रुपये
नागपूर – 52,030 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4770.00 Rs 4782.00 0.251 %⌃
8 GRAM Rs 38160 Rs 38256 0.251 %⌃
10 GRAM Rs 47700 Rs 47820 0.251 %⌃
100 GRAM Rs 477000 Rs 478200 0.251 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5203.00 Rs 5217.00 0.268 %⌃
8 GRAM Rs 41624 Rs 41736 0.268 %⌃
10 GRAM Rs 52030 Rs 52170 0.268 %⌃
100 GRAM Rs 520300 Rs 521700 0.268 %⌃

Leave a Comment