Gold Price : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे आजही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्या, नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली.मात्र, तरीही सोन्याचा दर 51 हजारांच्या वरच आहे.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 9.10 वाजता, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्सची किंमत 1 रुपयांनी घसरून 51,584 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आज बाजारातील सोन्याचे दर त्याच भावाने उघडले आणि बराच काळ स्थिर राहिले. विशेष म्हणजे, कोरोना महामारीच्या काळात सोन्याचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2020 मध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 55,700 रुपये होता.

चांदीच्या दरातही घसरण झाली मात्र तरीही दर 67 हजारांच्या वर
शुक्रवारी MCX वर चांदीच्या फ्युचर्स किंमतीत घसरण झाली, मात्र त्याचा दर अजूनही 67 हजारांच्या वरच आहे. सकाळी 9.10 वाजता चांदीचा भाव 222 रुपयांनी घसरून 67,265 रुपये किलो झाला. मात्र, आताही चांदी विक्रमी पातळीपेक्षा 6,000 रुपयांनी स्वस्त आहे. MCX वर आज चांदीचा दर 67,374 वर उघडला, जो घसरून 67,265 वर आला.

जागतिक बाजारपेठेत अस्थिरता
जागतिक बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात घट झाली आहे. जागतिक बाजारात, सकाळी सोन्याची स्पॉट प्राईस 0.10 टक्क्यांनी वाढून $1,938.85 प्रति औंस झाली. मात्र, चांदीचा दर 0.48 टक्क्यांनी खाली आला आहे आणि सुमारे $25 प्रति औंस राहिला आहे. याच्या एक दिवस आधीच जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,550 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,470 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,550 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,100 रुपये
पुणे – 48,180 रुपये
नागपूर – 48,180 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,470 रुपये
पुणे – 52,550 रुपये
नागपूर – 52,550 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4770.00 Rs 4770.00 0 %
8 GRAM Rs 38160 Rs 38160 0 %
10 GRAM Rs 47700 Rs 47700 0 %
100 GRAM Rs 477000 Rs 477000 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5203.00 Rs 5203.00 0 %
8 GRAM Rs 41624 Rs 41624 0 %
10 GRAM Rs 52030 Rs 52030 0 %
100 GRAM Rs 520300 Rs 520300 0 %

Leave a Comment