Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज MCX वर सोने 51 हजार रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे तर चांदीची किंमत 65 हजार रुपयांच्या खाली आली आहे. आज सकाळी MCX वर 24 कॅरेट सोन्याच्या जून महिन्याच्या फ्युचर्सचे भाव 116 रुपयांनी घसरून 51,468 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला सोने 54 हजार रुपयांच्या जवळपास गेले होते. मात्र गेल्या काही सत्रांत सोन्यामध्ये सातत्याने घसरण पहायला मिळाली. यादरम्यान सोने 1,800 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांनीं स्वस्त झाले आहे.

चांदीबद्दल बोलायचे झाल्यास MCX वर आज सकाळी चांदीमध्येही घसरण झाली आहे. चांदीच्या फ्युचर्सची किंमत 100 रुपयांनी कमी होऊन 64,868 रुपये प्रति किलो झाली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीमध्ये देखील घसरण पहायला मिळाली. या महिन्याच्या सुरुवातीला 70 हजार रुपयांच्या जवळपास असणारी चांदी घसरून 65 हजार रुपयांच्या खाली आली आहे.

जागतिक बाजारातही सोन्याची स्पॉट किंमत 0.37 टक्क्यांनी घसरून 1,898.60 डॉलर प्रति औंस झाली आहे. चांदीचा स्पॉट किंमत 0.13 टक्क्यांनी वाढून 23.50 डॉलर प्रति औंस झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याची किंमत 2,000 डॉलर प्रति औंस वर गेली होती, मात्र रशिया युक्रेन मधील युद्धामुळे सुरु असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे त्यात घसरण झाली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,910 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,860 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,910 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 48,450 रुपये
पुणे – 48,500 रुपये
नागपूर – 48,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,860 रुपये
पुणे -52,910 रुपये
नागपूर – 52,910 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4850.00 Rs 4904.00 1.101 %⌃
8 GRAM Rs 38800 Rs 39232 1.101 %⌃
10 GRAM Rs 48500 Rs 49040 1.101 %⌃
100 GRAM Rs 485000 Rs 490400 1.101 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5291.00 Rs 5349.00 1.084 %⌃
8 GRAM Rs 42328 Rs 42792 1.084 %⌃
10 GRAM Rs 52910 Rs 53490 1.084 %⌃
100 GRAM Rs 529100 Rs 534900 1.084 %⌃

Leave a Comment