हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्याभरात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price) वाढ झाली आहे. यादरम्यान सोने 722 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 1962 रुपये प्रति किलोने वाढली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला (16 ते 20 मे) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,305 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,027 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 999 शुद्धता असलेल्या चांदीचा भाव 60,042 रुपयांवरून वाढून 62,004 रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
गेल्या एका आठवड्याभरात सोन्याच्या दरात किती वाढ झाली ? (Gold Price)
16 मे 2022- 50,305 रुपये प्रति 10 ग्रॅम
17 मे 2022- 50,593 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 मे 2022- 50,283 रुपये प्रति 10 ग्रॅम
19 मे 2022- 50,682 रुपये प्रति 10 ग्रॅम
20 मे 2022 – 51,027 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या एका आठवड्याभरात चांदीच्या दरात किती वाढ झाली ?
16 मे 2022- 60,042 रुपये प्रति किलो
17 मे 2022- 61,302 रुपये प्रति किलो
18 मे 2022- 61,149 रुपये प्रति किलो
19 मे 2022- 61,087 रुपये प्रति किलो
20 मे 2022 – 62,004 रुपये प्रति किलो
इथे हे लक्षात घ्या की, IBGA ने जारी केलेल्या किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्ज पूर्वीच्या आहेत. यामध्ये GST चा समावेश केलेला नाही. Gold Price
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://ibjarates.com/
हे पण वाचा :
Taxation on Gold : आपल्याकडे असलेल्या सोन्यावर किती टॅक्स भरावा लागेल हे समजून घ्या
मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध? ; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
आता मास्क काढलाय, तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय?; सदाभाऊंची मुख्यमंत्र्यांवर टीका
लालमहालात नाच-गाण्यांचे चित्रीकरण करणाऱ्यांवर खा. छ. उदयनराजेंची कारवाईची मागणी
सदाभाऊंची भाजपमध्ये अवस्था ही नटरंगासारखी ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा पलटवार