गां** दम असेल तर मला उचलून दाखवा; ईडीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ईडीच्यावतीने कारवाया केल्या जात आहेत. भाजप विरोधात बोलणाऱ्यावर ईडीची लगेच कारवाई होते, अशी टीका महाविकास आघाडीकडून केली जात आहे. यावरून आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर ईडी व भाजपवर निशाणा साधला असून त्यांनी थेट ईडीलाच आव्हान दिले. मात्र, बोलताना त्यांची जीभ घसरली आहे. “देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केले आहे, उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहे. मलाही ईडीची नोटीस दिली होती, गां** दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी, असे प्रकाश आंबेडकर यांनी विधान केले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशात भाजपकडून दडपशाहीचे राजकारण केले जात आहे. माझ्यावरही ईडीकडून कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मलाहि ईडीने कारवाईसाठी पत्र पाठवले होते. मात्र, मी काही घाबरलो नाही. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही, असेही आंबेडकर यांनी म्हंटले.

अजित पवारांनी टीव्हीशी बोलल्यापेक्षा वकिलांना घेऊन…

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, अजित पवार दररोज ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवर बोलतात. ये टीव्हीसमोर येतात आणि माहिती देतात. त्यांनी टीव्हीशी बोलल्यापेक्षा वकिलांना घेऊन खुली चर्चा का करत नाहीत? त्यांनी ती चर्चा करावी, असा सवाल आंबेडकरांनी यावेळी केला.