Gold Price : आजचे सोन्या-चांदीचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. सोन्याच्या दरात आज सोमवारी घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 47,930 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर आज चांदीही घसरली आहे. मुंबईमध्ये चांदीचा भाव 800 रुपयांनी घसरून 66,400 रुपयांवर पोहोचला आहे.

सोने विक्रमी पातळीपेक्षा 1000 रुपयांनी स्वस्त आहे
गेल्या वर्षी 11 नोव्हेंबर रोजी MCX वर प्रति 10 ग्रॅम24 कॅरेट सोन्याचा भाव ₹50,259 वर होता. त्याच वेळी आता तो 48,930 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यानुसार सध्या सोने स्वस्त झाले आहे. आता लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत सोन्या-चांदीचे वाढलेले दर सर्वसामान्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात.

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47,930 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 48,290 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 66,400 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50850 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48930 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,930 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47930 रुपये
पुणे – 47520 रुपये
नागपूर – 47,930 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48930 रुपये
पुणे – 50850 रुपये
नागपूर – 48,930 रुपये

You might also like