हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेक क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजाराचे पण कंबरडे मोडले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमकुवत होत चालला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. Gold Price Pune
सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 39 हजार 661 रुपये एवढे झाले आहेत. म्हणजे सोन्याचे दर 1949 रुपयांनी घसरले असून, 39,661 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचा दर प्रति किलो 6445 रुपयांनी घसरला. सोमवारी दिल्लीत सोने 455 रुपयांनी वाढून 41,610 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. चांदी मात्र 1,283 रुपयांनी घसरून 40,304 रुपये किलो झाली. शुक्रवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 42017 रुपयांवर बंद झाले होते. Gold Price Pune
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सोने अन् चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सोन्याचे दर उतरल्यानं ग्राहकांची सोने खरेदीसाठी झुंबड उडाली असून, अनेक सोन्याच्या दुकानांत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.