Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचा भाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील चढउतारांमुळे बुधवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उसळी आली. सोन्याचा भाव एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता, जो पुन्हा चढता आहे.

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी 9.10 वाजता, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली होती, जी नंतर 50,947 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत आहे. यापूर्वी सततच्या घसरणीमुळे सोन्याचे भाव महिन्याभराच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते. आज सकाळी MCX वर सोन्याच्या दरात 0.25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येण्याच्या शक्यतेमुळे सोन्याचा भाव 1.2 टक्क्यांनी घसरून 50,354 रुपयांवर आला. एका महिन्यातील ही सर्वात कमी किंमत आहे.

चांदीही चमकली, दर वाढले आहेत
बुधवारी MCX वर चांदीच्या फ्युचर्समध्ये 0.23 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली, त्यामुळे चांदीचा दर पुन्हा एकदा 67 हजारांच्या पुढे गेला. सकाळी चांदीचा भाव 67,102 रुपये प्रति किलो होता. यापूर्वी सततच्या घसरणीमुळे चांदीचे दर 67 हजारांच्या खाली पोहोचले होते.

जागतिक बाजारपेठेत किमतीत वाढ
जागतिक बाजारातही सोन्याचे दर गेल्या काही सत्रांमध्ये 2 टक्क्यांनी घसरल्यानंतर आज 0.1 टक्क्यांनी वाढले. सोन्याची स्पॉट किंमत आज 1,920.6 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. मंगळवारी तो 1.8 टक्क्यांनी घसरून 28 फेब्रुवारीनंतरच्या नीचांकी पातळीवर आला होता. जागतिक बाजारातही आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 0.25 टक्क्यांनी वाढून 24.99 डॉलर प्रति औंस झाली.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,030 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,980 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,030 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,650 रुपये
पुणे – 47,700 रुपये
नागपूर – 47,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,980 रुपये
पुणे – 52,030 रुपये
नागपूर – 52,030 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4782.00 Rs 4805.00 0.479 %⌃
8 GRAM Rs 38256 Rs 38440 0.479 %⌃
10 GRAM Rs 47820 Rs 48050 0.479 %⌃
100 GRAM Rs 478200 Rs 480500 0.479 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5217.00 Rs 5240.00 0.439 %⌃
8 GRAM Rs 41736 Rs 41920 0.439 %⌃
10 GRAM Rs 52170 Rs 52400 0.439 %⌃
100 GRAM Rs 521700 Rs 524000 0.439 %⌃

Leave a Comment