Gold Price : सोने चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती

Gold Price
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ झाल्याचे दिसून येते आहे. त्याचबरोबर चांदीही महागली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 83 रुपयांची किंचित वाढ तर चांदीच्या दरात प्रति किलो 367 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (5 ते 9 डिसेंबर) म्हणजेच 5 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 53,854 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 53,937 रुपये प्रति 10 झाला. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 65,764 रुपयांवरून 66,131 रुपये प्रति किलो झाली आहे. Gold Price

Gold discount in India falls despite prices rising over over 1-month high | Mint

इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price

Gold rates in India near lowest in 3 months | Mint

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)

5 डिसेंबर 2022 – 53,854 रुपये प्रति 10 ग्रॅम
6 डिसेंबर 2022 – 53,629 रुपये प्रति 10 ग्रॅम
7 डिसेंबर 2022 – 53,583 रुपये प्रति 10 ग्रॅम
8 डिसेंबर 2022 – 53,780 रुपये प्रति 10 ग्रॅम
9 डिसेंबर 2022 – 53,937 रुपये प्रति 10 ग्रॅम

Designer Jewelry | Artisan Jewelry | Roma Jewelry

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)

28 नोव्हेंबर 2022 – 62,110 रुपये प्रति किलो
29 नोव्हेंबर 2022 – 61,685 रुपये प्रति किलो
30 नोव्हेंबर 2022 – 61,900 रुपये प्रति किलो
01 डिसेंबर 2022 –  63,203 रुपये प्रति किलो
02 डिसेंबर 2022 –  64,434 रुपये प्रति किलो

सोन्याच्या साठ्यामध्ये घट

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) देशाची सोन्याची आयात 17.38 टक्क्यांनी घटून 24 अब्ज डॉलर्सवर आली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात 29 अब्ज डॉलर्स होती. Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/

हे पण वाचा :
Stock Tips : सणासुदीच्या हंगामात ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स मिळवून देतील मोठा नफा, याबाबत तज्ञांचे मत जाणून घ्या
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद