हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 16 रुपयांनी घसरून 53,248 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. ही 3 जून 2022 ची फ्युचर्सची किंमत आहे. एक दिवसापूर्वी सोन्याच्या दरात सुमारे 500 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, या आठवड्यात सोन्याचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सोन्याच्या धर्तीवर, चांदीचा भावही 101 रुपये किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून 69,998 रुपये प्रति किलो झाला. एक दिवसापूर्वीपर्यंत चांदीची विक्री 70 हजारांच्या वर होती. चांदीची ही फ्युचर्स किंमत 5 मे 2022 साठी आहे. एक दिवस आधीपर्यंत, एमसीएक्सवर सोने 53,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 69,499 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,460 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,380 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,460 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,850 रुपये
पुणे – 49,880 रुपये
नागपूर – 49,880 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 54,380 रुपये
पुणे -54,460 रुपये
नागपूर – 54,460 रुपये
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4988.00 | 0 % |
8 GRAM | Rs 39904 | 0 % |
10 GRAM | Rs 49880 | 0 % |
100 GRAM | Rs 498800 | 0 % |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5446.00 | 0 % |
8 GRAM | Rs 43568 | 0 % |
10 GRAM | Rs 54460 | 0 % |
100 GRAM | Rs 544600 | 0 % |