हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोन्यात काही प्रमाणात नफा-वसुली झाली. काल दिवस अखेर सोने 1851 डॉलर्स प्रति औंसच्या पातळीवर बंद झाले. तसेच काल MCX वर सोन्याचा भाव 50,984 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
सोन्यामध्ये आणखी घसरण होणार ???
IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले की,” बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस 1865 डॉलर प्रति औंसच्या वर गेली. त्यानंतर शुक्रवारी ती 1850 डॉलर प्रति औंसने खाली घसरली. अशा स्थितीत आता सोन्यामध्ये आणखी घसरण होऊ शकेल. तसेच त्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात 1830 डॉलर्स तर भारतीय बाजारात 50,500 रुपयांच्या पातळीवर येऊ शकतील. त्यामुळे ज्यांना सोन्याची खरेदी करायचे असेल त्यांनी किंमतींवर लक्ष ठेऊन हळूहळू खरेदी सुरू करावी.” Gold Price
सोन्याची हळूहळू खरेदी सुरू करा
अनुज गुप्ता पुढे म्हणाले की,”50 हजार रुपयांच्या पातळीवर आल्यानंतर हळूहळू सोन्याची खरेदी सुरू करावी आणि सोने 48700 च्या वर असेपर्यंतच खरेदी करावी. या नंतर सोन्यामध्ये मोठी वाढ होऊ शकेल. 50 हजार रुपयांची पातळी ओलांडली की ते 52,300 ते 52,800 पर्यंत पोहोचू शकेल.” Gold Price
सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे कल पुन्हा वाढेल
रेलिगेअर ब्रोकिंगच्या सुगंधा सचदेव यांनी सांगितले की, या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्यावर दबाव दिसून आला. त्याचवेळी व्याजदरात आणखी वाढ होण्याच्या भीतीमुळे यूएस ट्रेझरी उत्पन्नात देखील वाढ झाली, ज्यामुळे सोन्यावरील दबावात आणखी वाढ झाली.” त्या पुढे म्हणाल्या की,” पुढे जाऊन सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडील कल पुन्हा वाढेल. तसेच सोन्याच्या ट्रेडिंगमध्ये देखील वाढ दिसून येईल.” Gold Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiainfoline.com/
हे पण वाचा :
‘DUNKI’ म्हणजे काय??? शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाच्या थीमविषयी जाणून घ्या !!!
EPF कि NPS यापैकी रिटायरमेंटसाठी कोणती योजना चांगली आहे हे समजून घ्या
EPFO : मोदी सरकार नोकरदारांना लवकरच देणार गुड न्यूज; PF खातेधारकांना होणार फायदा
PM KISAN : 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ??? यामागील कारणे जाणून घ्या
Bank FD : जास्त व्याज मिळवण्यासाठी पालकांच्या नावाने सुरु करा FD !!!