Gold Price – सोन्याच्या दरात जोरदार घसरण, आता किती स्वस्त झाले आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लग्नाच्या मोसमात सोन्याच्या किंमतीत तीन दिवस घसरण सुरूच आहे , अशा परिस्थितीत जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज, फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.05 टक्क्यांनी घसरला, तर चांदीचा भाव 0.8 टक्क्यांनी घसरला.

ऑगस्ट 2020 मध्ये, MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज, MCX वर सोने फेब्रुवारी फ्युचर्स 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही 8000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त मिळत आहे.

आज सोन्या-चांदीची किंमत काय आहे जाणून घ्या
फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 0.17 टक्क्यांनी घसरून आज 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या व्यवहारात चांदीही खूप स्वस्त झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.19 टक्क्यांनी घसरून 61,298 रुपयांवर आला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,800 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,630 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,630 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,630 रुपये
पुणे – 46,800 रुपये
नागपूर – 47,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,630 रुपये
पुणे – 49,800 रुपये
नागपूर – 48,630 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4680.00 Rs 4680.00 0 %
8 GRAM Rs 37440 Rs 37440 0 %
10 GRAM Rs 46800 Rs 46800 0 %
100 GRAM Rs 468000 Rs 468000 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4980.00 Rs 4980.00 0 %
8 GRAM Rs 39840 Rs 39840 0 %
10 GRAM Rs 49800 Rs 49800 0 %
100 GRAM Rs 498000 Rs 498000 0 %

Leave a Comment