Gold Rate Today 7 July 2023: खुशखबर…! सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today 7 July 2023: देशात लोकांना सर्वात जास्त हौस असते ती सोने खरेदीची. यात महिला खूप आघाडीवर असतात. कारण महिलांना सोने खरेदी करण्यामध्ये विशेष आनंद मिळत असतो.

मात्र काही लोक सोने खरेदीकडे फक्त गुंतवणूक म्ह्णून पाहत असतात. त्यामुळे जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज सोने व चांदी तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 69 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58531 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 69634 रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, गुरुवारी संध्याकाळी 999 शुद्धतेचे (24 कॅरेट) शुद्ध सोने 58,644 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे आज (शुक्रवारी) सकाळी 58,531 रुपयांवर आले आहे. तसेच शुद्धतेच्या आधारे सोने स्वस्त झाले असून चांदी महाग झाली आहे.

आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?

ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज म्हणजेच 7 जुलै रोजी सकाळी 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,297 रुपयांवर आली आहे. त्याचवेळी 916 शुद्धतेचे (22 कॅरेट) सोने आज 53614 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याची किंमत 43898 पर्यंत खाली आली आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे सोने (14 कॅरेट) आज 34241 रुपयांनी स्वस्त झाले असून 999 शुद्धतेचे एक किलो चांदी आज 69634 रुपयांवर पोहोचले आहे.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत –

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, शनिवार आणि रविवारी इब्जाकडून दर जारी केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBJA द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य आहेत परंतु GST त्यांच्या किमतींमध्ये समाविष्ट नाही. तसेच दागिने खरेदी करताना, करांच्या समावेशामुळे सोने किंवा चांदीचे दर जास्त आहेत.