Gold Price Today| दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या कारणामुळेच आज सराफ बाजारात ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. परंतु ऐन मोक्यावर सोन्या चांदीचे भाव पुन्हा वाढले आहेत. गुरुवारपर्यंत सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव कमी किमतीत व्यवहार करत होते. मात्र आज हेच भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.
धनत्रयोदशी म्हणजेच आज Good Returns नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,000 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,090 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,000 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,090 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज सोन्याचे भाव वाढले असले तरी ग्राहक उत्साहाने सोने खरेदी करत आहेत.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,000 रुपये
मुंबई – 56,000 रुपये
नागपूर – 56,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,090 रूपये
मुंबई – 61,090 रूपये
नागपूर – 61,090 रुपये
चांदीचे भाव
आजच्या दिवशी फक्त सोन्याचेच नाही तर चांदीचे देखील भाव (Gold Price Today) वाढले आहेत. कारण आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 740 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,400 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,000 रुपयांनी सुरू आहे. ज्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणे मुश्किल होऊन बसले आहे.
दरम्यान, आज तुम्हाला जर सोने खरेदी करायचे असेल तर लक्ष्मी माता आणि भगवान कुबेर यांची पूजा केल्यानंतर सोने खरेदी करा. किंवा पूजेच्या शुभमुहूर्ताच्या काळामध्ये देखील सोने खरेदी करणे योग्य ठरेल. कारण आजच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.