Gold Price Today | पैशांची गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती सोन्यामध्ये करावी, असा सल्ला आपल्याला अनेकांकडून दिला जातो. मात्र सध्या या सोन्याच्या भावामध्ये कमालीची वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. मंगळवारी सोन्याच्या किमतीमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याचे दागिने मोडल्यास त्याची चांगली रक्कम मिळू शकते. मात्र हेच सोन्याचे दागिने आपण करायला गेलो तर आपल्या खिशाला कात्री देखील बसू शकते. यासाठीच ग्राहकांनी आजचे सोन्या-चांदीचे भाव तपासूनच सराफ बाजारात जावे.
मंगळवारी Good Returns नुसार, सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,650 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,530 रूपये असा सुरू आहे. तर MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,650 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,530 रुपयांनी व्यवहार करत आहे. या दोन्ही वेबसाईटनुसार आजच्या सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. (Gold Price Today)
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 53,650 रुपये
मुंबई – 53,650 रुपये
नागपूर – 53,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,530 रूपये
मुंबई – 58,530 रूपये
नागपूर – 58,530 रुपये
चांदीचे भाव
आजचे चांदीचे भाव सोमवारप्रमाणे स्थिर आहेत. आज चांदीच्या भावामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 726 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,260 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 72,600 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात देखील +5, +50, +500 अशा फरकाने वाढ झाली आहे.
प्लॅटिनमची किंमत
मंगळवारी सोन्यासोबत प्लॅटिनमच्या किमतीत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,760 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,37,600 असा सुरू आहे. आज सोन्या चांदीसोबत (Gold Price Today) प्लॅटिनमच्या किमतीत देखील घट न झाल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे