Gold Price Today| राज्यात दिवाळीपर्वाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी सराफ बाजारात देखील गर्दी दिसून येत आहे. आज दिवाळीच्या मुहुर्तावर सोन्याचे भाव कमी झाले आहेत. तर चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. तसेच, दिवाळी असल्यामुळे बाजारात दागिन्यांच्या नवीन व्हरायटीज आल्या आहेत. त्यामुळे आज सराफ बाजारात जाण्यापूर्वी सोन्या चांदीचे भाव नक्की तपासा.
आज Good Returns नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,550 रुपयांनी व्यवहार (Gold Price Today) करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,600 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,000 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,090 रुपयांनी व्यवहार करत आहे. ज्यामुळे ग्राहकांची दणक्यात खरेदी सुरू आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,550 रुपये
मुंबई – 55,550 रुपये
नागपूर – 55,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 60,600 रूपये
मुंबई – 60,600 रूपये
नागपूर – 60,600 रुपये
चांदीचे भाव
आज दिवाळी मुहुर्तावर चांदीचे भाव (Gold Price Today) घसरले आहेत. 10 ग्रॅम चांदीचा भाव 730 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,300 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 73,000 रुपयांनी सुरू आहे. सणासुदीत मूल्यवान दागिन्यांच्या किमती कमी झाल्याने सराफ बाजारात ही मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे.
नरक चतुर्दशी
आज छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी आहे. आजच्या दिवशी यम देवतेची पूजा करण्यात येते. तसेच यमदीप प्रज्वलित करण्यात येतात. आजच्या दिवसाला हिंदू धर्मात विशेष स्थान देण्यात आले आहे. ज्यामुळे आजच्या या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्यात येते.