Gold Price Today | ऐन दिवाळीच्या काळात सोन्या चांदीच्या भावामध्ये दररोज चढ उतार पाहिला मिळत आहेत. मध्यंतरी घसरत चाललेले सोन्या-चांदीचे भाव आता पुन्हा वाढायला लागले आहेत. गेल्या एक आठवड्यापासून सोन्या चांदीच्या किमतींनी उसळी मारली आहे. तर आजचे सोन्याचे भाव 53 हजारांवर स्थिर झाले आहेत. बुधवारी सोन्याच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आजचे सोन्याचे भाव जैसे थे वैसे आहेत. मात्र आज चांदीच्या किंमती उतरल्या आहेत. सोबत प्लॅटिनमचे भाव देखील घसरले आहेत.
बुधवारी Good Returns नुसार, सोन्याच्या वाढलेल्या किंमती (Gold Price Today) स्थिर झाल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,650 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,530 रूपये असा सुरू आहे. तर MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,650 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,530 रुपयांनी व्यवहार करत आहे. म्हणजेच, आज सोन्याचा भावामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
(Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 53,650 रुपये
मुंबई – 53,650 रुपये
नागपूर – 53,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,530 रूपये
मुंबई – 58,530 रूपये
नागपूर – 58,530 रुपये
चांदीचे भाव
आज सोन्याचे भाव वाढलेले असले तरी चांदीच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. बुधवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 721 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,210 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 72,100 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात देखील -5, -50, -500 अशा फरकाने घसरण झाली आहे.
प्लॅटिनमची किंमत
विशेष म्हणजे, सोन्याचे भाव वाढले असताना चांदी आणि प्लॅटिनमच्या किमती कमी झाल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,580 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,35,800 असा सुरू आहे. त्यामुळे आज ग्राहकांना सोन्याऐवजी चांदी आणि प्लॅटिनमची खरेदी करणे जास्त परवडेल.