Gold Price Today| दिवाळी म्हटलं की, सोन्या-चांदीची खरेदी आलीच. या कारणामुळेच सध्या सराफ बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल दिसून येत आहे. आनंदाची बाब म्हणजे, आज म्हणजेच सोमवारी सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी उलाढाल होताना पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील अशा शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर प्रथम आजचे सोन्या चांदीचे भाव तपासा.
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुड रिटर्न्सनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,450 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,490 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,450 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,490 रुपयांनी व्यवहार करत आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,450 रुपये
मुंबई – 55,450 रुपये
नागपूर – 55,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,490 रूपये
मुंबई – 61,490 रूपये
नागपूर – 61,490 रुपये
चांदीचे भाव
बऱ्याच वेळा सोन्याचे भाव वाढले असता चांदीचे भाव कमी झालेले असतात. परंतु आज सोने चांदीचे एकत्र भाव कमी झाले आहेत. सोमवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 724 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,240 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 72,400 रुपयांनी सुरू आहे. ज्यामुळे महीला वर्ग पैंजण, जोडवी, मासोळ्या खरेदी करण्यावर जास्त भर देत आहेत.
सोमवती अमावस्या
आज 13 नोव्हेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे. या अमावस्येच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करते. हिंदू धर्मात या अमावस्येला विशेष मानले जाते. तसेच, आजच्या दिवशी घरात एखादी वस्तू खरेदी करण्यावर देखील जास्त भर दिला जातो. त्यामुळे लोक जास्त प्रमाणात सोने खरेदीवर भर देतात.