Gold Price Today| आज भाऊबीज असल्यामुळे सराफ बाजारात जरा जास्तच गर्दी दिसून येत आहे. मात्र अशा शुभ मुहूर्तावरच आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहे. तर चांदीच्या किमती ही उंचावल्या आहेत. एकीकडे भाऊबीज सणामुळे बहिणीला भेटवस्तू देण्यासाठी भावांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली असताना दुसरीकडे मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आज कोणताही दागिना खरेदी करताना भावाच्या खिशाला कात्री बसणार आहे.
आजचे गुड रिटर्न्सनुसार सोन्याचे भाव पाहता, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,040 रूपयांनी सुरू आहे. आज MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,950 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,040 रुपयांनी व्यवहार करत आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,950 रुपये
मुंबई – 55,950 रुपये
नागपूर – 55,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 60,040 रूपये
मुंबई – 60,040 रूपये
नागपूर – 60,040 रुपये
चांदीचे भाव
लक्ष्मीपूजननंतर बुधवारी चांदीच्या किमती वाढल्या आहेत. कारण आज, 10 ग्रॅम चांदीचा भाव 747 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,470 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,700 रुपयांनी सुरू आहे. ज्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात चांदी खरेदी करणाऱ्यांची निराशा होत आहे.
भाऊबीज सण
आज दिवाळी पर्वातील शेवटचा सण भाऊबीज आहे. आजच्या दिवशी बहिण आपल्या भावाचे औक्षण करते. त्यासाठी प्रार्थना करते. यानंतर भाऊ आपल्या बहिणीला छान अशी भेटवस्तू देतो. खास करून आजच्या दिवशी, एखादा दागिना दिल्यावर जास्त भर दिला जातो. मात्र अशा काळात सोन्या-चांदीच्या किमती वाढल्यामुळे दागिने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले आहे.
.