Gold Price Today| नवीन वर्ष सुरू झाले की विविध समारंभाला देखील सुरुवात होते. त्यामुळेच सराफ बाजारात ग्राहकांची रेलचेल दिसून येते. सध्याच्या घडीला सोन्या चांदीच्या दागिन्यांमध्ये अनेक नवीन व्हरायटी आल्या आहेत. अशातच ग्राहकांसाठी आनंदाची बाब म्हणजे, सोन्या चांदीचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना खिशाचा विचार न करता दागिने खरेदी करता येणार आहेत.
मंगळवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,050 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,330 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,050 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,330 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,050 रुपये
मुंबई – 58,050 रुपये
नागपूर – 58,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,330 रूपये
मुंबई – 63,330 रूपये
नागपूर – 63,330 रूपये
चांदीचे भाव
आंतरराष्ट्रीय पातळी सध्या चांदीचे भाव देखील घसरले आहेत. त्याचेच परिणाम स्थानिक पातळीवर दिसून येत आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 765 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,650 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,500 अशी आहे. त्यामुळेच आता चांदीला जास्त मागणी केली जात आहे.