Gold Price Today| राज्यात नवरात्र उत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सोन्याचे भाव देखील कमी झालेले दिसत आहेत.सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी वाढत गेलेले सोन्याचे भाव आज म्हणजेच सोमवारी घसरले आहेत. या कारणामुळेच आज सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. चला मग पाहुयात आजचे सोन्या चांदीचे बदलले भाव…
Good Returns नुसार आज, सोन्याच्या किमती (Gold Price Today) घसरल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,100 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,110 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,100 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,110 रुपयांनी व्यवहार करत आहे. ज्यामुळे, ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,100 रुपये
मुंबई – 55,100 रुपये
नागपूर – 55,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 60,110 रूपये
मुंबई – 60,110 रूपये
नागपूर – 60,110 रुपये
चांदीचे भाव
आज सोन्याचे भाव कमी झाले असले तरी चांदीच्या किंमती वाढलेल्या आहेत. (Gold Price Today) आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 741 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,410 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,100 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात देखील +15, +150, +1500 अशा फरकाने वाढ झाली आहे.
दरम्यान, नवरात्र उत्सवाचा काळ सोने चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे ग्राहक याच काळात जास्त प्रमाणात सोन्याची खरेदी करतात. यामुळे सराफ बाजारात देखील मोठी उलाढाल पाहायला मिळते. परंतु सध्या दररोज सोन्या चांदीच्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे ग्राहकांची निराशा होताना दिसत आहे. मात्र आज सोन्याच्या (Gold Price Today) किमती घसरल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढली आहे.