Gold Price Today : सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा नाहीच! सोन्या चांदीच्या किंमती उसळल्या; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू झाली आहे. या काळात सराफ बाजारात देखील सोने खरेदीसाठी गर्दी पाहिला मिळत आहे. परंतु अशा काळातच सराफ बाजारातील सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत्या भावामुळे सोने नेमके कधी खरेदी करावे? असा प्रश्न ग्राहकांपुढे उभा राहिला आहे. आज म्हणजेच शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले आहेत.

शनिवारी Good Return वेबसाईटनुसार, सोन्याच्या किंमती (Gold Price Today) प्रचंड वाढलेल्या दिसत आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 54,900 रुपये इतकाच आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज बाजारात 59,890 रुपये एवढी सुरू आहे. यासोबतच MCX वेबसाईटनुसार पाहिला गेलो तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 54,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. यासोबत, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,670 रुपये सुरू आहे. वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले आहे.

Gold Price Today
Gold Price Today

 गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,900 रुपये
मुंबई – 54,900 रुपये
नागपूर – 54,900 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,890 रूपये
मुंबई – 59,890 रूपये
नागपूर – 59,890 रुपये

Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

शनिवारी सोन्यासोबत चांदीच्या किमतीत (Gold Price Today) देखील मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खिशाला चांगली कात्री बसू शकते. शनिवारी 10 ग्रॅम चांदी 747 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,470 रुपयांनी विकली जात आहे. तसेच 1 हजार ग्रॅम चांदी 74,700 रुपये भावाने सुरू आहे. चांदीचे देखील वाढलेले भाव ग्राहकांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत.

प्लॅटिनमच्या आजच्या किंमती

आज सर्वच मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याचे चित्र दिसत आहे. सोन्या-चांदीसोबत प्लॅटिनमच्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. काल 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,410 रुपये एवढी होती. मात्र शनिवारी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,760 आहे. त्यासोबतच 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,47,600 रुपयांनी व्यवहार करत आहे.