Gold Price Today| सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाईचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. परिणामी स्थानिक पातळीवर सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. मात्र आता हेच सोन्याचे भाव दिवसेंदिवस घसरताना दिसत आहेत. बुधवारी सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. तसेच, चांदीच्या किमती उतरल्या आहेत. अशा स्थितीमध्ये ग्राहक सोने चांदी खरेदीवर जास्त भर देऊ शकतात.
बुधवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,050 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,330 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,050 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,330 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,700 रुपये
मुंबई – 57,700 रुपये
नागपूर – 57,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,950 रूपये
मुंबई – 62,950 रूपये
नागपूर – 62,950 रूपये
चांदीचे भाव
आज चांदीच्या भावात (Gold Price Today) देखील 300 रुपयांनी घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 759 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,590 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,900 अशी आहे. त्यामुळे आता चांदीच्या दागिन्यांच्या मागणी देखील वाढ होणार आहे.
सोने खरेदी करताना शुद्धता तपासा
सराव बाजारात सोने खरेदी करायला गेल्यानंतर कधीही सोन्याची शुद्धता व्यवस्थित रित्या तपासावी. यासाठी सर्वात प्रथम दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते पहावे. कारण, 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकणे नियमांच्या बाहेर बसते.