Gold Price Today: सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मंगळवारी सोन्याचे भाव पुन्हा घसरले आहेत. त्यामुळे आजचा दिवस सोने खरेदी करण्यासाठी अगदी योग्य मानला जात आहे. तसेच, आज चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे एकाच दिवशी ग्राहक दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी करू शकतात. मग चला पाहूयात आजचे सोन्या चांदीचे भाव काय आहेत. (Gold Price Today)

Good Returns नुसार आज सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,950 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,090 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,100 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करणे ग्राहकांना चांगलेच परवडू शकते.

Gold Price Today
                                                                                                     Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,950 रुपये
मुंबई – 54,950 रुपये
नागपूर – 54,950 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 59,950 रूपये
मुंबई – 59,950 रूपये
नागपूर – 59,950 रुपये

Gold Price Today
                                                                                                             Gold Price Today

चांदीचे भाव

मंगळवारी सोन्यासोबत चांदीच्या किमती देखील कमी झाल्या आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 736 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,360 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 73,600 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात देखील -5, -50, -500 अशा फरकाने घसरण झाली आहे.

दरम्यान, राज्यात 15 ऑक्टोंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारात देखील सोने खरेदीसाठी (Gold Price Today) ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. नवरात्रीच्या काळातच सोन्या-चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.