Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| नवरात्र उत्सवाच्या काळात ग्राहकांना सोने खरेदी करणं अवघड होऊन बसलं आहे. कारण, आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमती देखील वाढल्या आहेत.. त्यामुळे याकाळात सराफ बाजारात ही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आता पुढील काही दिवस सोन्या चांदीच्या किमतींमध्ये असेच बदल पाहायला मिळतील अशा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

बुधवारी, सोन्याच्या किमतीत Gold Price Today) वाढ झाली आहे. Good Returns नुसार आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,450 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60490 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,450 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,490 रुपयांनी व्यवहार करत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,450 रुपये
मुंबई – 55,450 रुपये
नागपूर – 55,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 60490 रूपये
मुंबई – 60490 रूपये
नागपूर – 60490 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

आज चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 746 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,460 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,600 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात देखील +10,+100, +1000 अशा फरकाने वाढ झाली आहे.

दरम्यान, राज्यात 15 ऑक्टोंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारात देखील सोने खरेदीसाठी Gold Price Today ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. मात्र अशा काळातच सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची खरेदीबाबत मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांकडून सोन्या चांदीच्या किमती कमी होण्याबाबत आशा व्यक्त केले जात आहे.