Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ, मात्र चांदीच्या भावात घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| नवरात्र उत्सवात सोन्या चांदीच्या दागिन्यांना सर्वात जास्त मागणी करण्यात येते. मात्र सध्या सोन्या-चांदीचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीपूर्वी दहा वेळा विचार करावा लागत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमती किंचित घसरल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याऐवजी ग्राहकांनी चांदीची खरेदी करावी.

गुरूवारी Good Returns नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची (Gold Price Today) किंमत 55,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,760 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,700 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,760 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,700 रुपये
मुंबई – 55,700 रुपये
नागपूर – 55,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 60,760 रूपये
मुंबई – 60,760 रूपये
नागपूर – 60,760 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

गुरुवारी ग्राहकांना चांदीच्या भावात (Gold Price Today) दिलासा मिळाला आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 741 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,410 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,100 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात -5,-50, -500 अशा फरकाने घसरण झाली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये दररोज बदल पाहायला मिळत आहे. सध्या नवरात्रीचा काळ सुरू असताना सोन्या-चांदीच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची सोने खरेदीबाबत निराशा होत आहे. तर, या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना नागरिकांसाठी सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले आहे.