Gold Price Today| गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024 – 2025 वर्षाचे बजेट सादर केले. या बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. तर, नोकरदार वर्ग असो किंवा महिला वर्ग यांच्या अपेक्षा सरकारने भंग केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला गुरुवारी बजेट सादर झाल्यानंतर आज सोन्या चांदीचे भावही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आज सोने चांदी खरेदी करताना पाहिले आजचे भाव तपासा.
शुक्रवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,600 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,150 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 32,440 रुपयांनी व्यवहार करत आहे. यातून स्पष्ट दिसते की, बजेटनंतर ही ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,300 रुपये
मुंबई – 58,300 रुपये
नागपूर – 58,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,600 रूपये
मुंबई – 63,600 रूपये
नागपूर – 63,600 रूपये
चांदीचे भाव
आजचे चांदीचे भाव पाहिला गेलो तर यामध्ये देखील ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. कारण, 10 ग्रॅम चांदीचा भाव 765 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,650 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,500 रूपये अशी आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्राहकांना सोन्या-चांदीचे भाव कमी होईपर्यंत खरेदीसाठी वाट पाहावी लागणार आहे.