Gold Price Today| राज्यात येत्या 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी सण साजरी केला आहे. त्यामुळे आतापासूनच सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सराफ बाजारात लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या शुभमुहर्तावर जास्त प्रमाणात सोने खरेदी केले जाते. परंतु सध्या याच सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. गुरुवारी पुन्हा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. यासोबतच, चांदीच्या भावात ही लक्षणीय वाढ झाली आहे.
Good Returns नुसार गुरुवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,500 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,640 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,390 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,520 रुपयांनी व्यवहार करत आहे. आई संसदीच्या काळात सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,500 रुपये
मुंबई – 56,500 रुपये
नागपूर – 56,500रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,640 रूपये
मुंबई – 61,640 रूपये
नागपूर – 61,640 रुपये
चांदीचे भाव
आज फक्त सोन्याचेच नाही तर चांदीचे देखील भाव वाढले आहेत. गुरुवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 748 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,480 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,800 रुपयांनी सुरू आहे. ज्यामुळे चांदीचे दागिनेही खरेदी करणे ग्राहकांसाठी मुश्किल होऊन बसले आहे.
प्लॅटिनमची किंमत
आजची खास बाब म्हणजे, एकीकडे सोन्या चांदीच्या किमती वाढल्या (Gold Price Today) असताना प्लॅटिनमच्या किंमत कमी झाल्या आहेत.
आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,770 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,47,700 असा सुरू आहे. त्यामुळे आज जास्त प्रमाणात प्लॅटिनमच्या दागिन्यांची खरेदी केली जात आहे.