Gold Price Today| आज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. बऱ्याच काळानंतर सोन्या चांदीचे भाव घसरले आहेत. दिवाळी काळानंतर सोन्या चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या भावांनी उच्चांकाची पातळी गाठली होती. मात्र सणासुदीचा काळ गेल्यानंतर हेच भाव कमी झाले आहेत. ज्यामुळे सोने खरेदीसाठी सराफ बाजारात ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.
आजचे गुड रिटर्न्सनुसार सोन्याचे भाव पाहता, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,640 रूपयांनी सुरू आहे. आज MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,500 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,640 रुपयांनी व्यवहार करत आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,500 रुपये
मुंबई – 56,500 रुपये
नागपूर – 56,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,640 रूपये
मुंबई – 61,640 रूपये
नागपूर – 61,640 रुपये
चांदीचे भाव
आज सोन्याच्या भावाबरोबर चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. कारण की, 10 ग्रॅम चांदीचा भाव 760 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच , 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,600 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 76,000 रुपयांनी सुरू आहे. ज्यामुळे आजचा दिवस सोन्यासोबत चांदीची खरेदी करण्यासाठी देखील योग्य आहे.