Gold Price Today| गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किमती वाढल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली होती. आज तिचं वाढ कायम आहे. त्यामुळे आजच्या दिवशी ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे आता सोन्याच्या किमतींवर देखील परिणाम होऊ लागला आहे.
Good Return नुसार, बुधवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमती (Gold Price Today) स्थिर आहेत तर 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ झालेली आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,200 रुपयांनी सुरू आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव सराफ बाजारात 60,230 रुपयांनी सुरू आहे. आपण जर MCX वेबसाईटनुसार सोन्याच्या आजच्या किमती पाहिला गेलो तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,200 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,230 रुपयांनी व्यवहार करत आहे. या किमती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आज सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,200 रुपये
मुंबई – 55,200 रुपये
नागपूर – 55,200 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,230 रूपये
मुंबई – 60,230 रूपये
नागपूर – 60,230 रुपये
चांदीचे आजचे भाव
सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today) वाढले असले तरी चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्यापेक्षा चांदी खरेदी करणे ग्राहकांना जास्त परवडू शकते. बुधवारी, 10 ग्रॅम चांदी 745 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,450 रुपयांनी विकली जात आहे. तसेच 1 हजार ग्रॅम चांदी 74,500 रुपये भावाने सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी हेच भाव गगनाला भिडले होते.
प्लॅटिनमच्या आजच्या किंमती
बुधवारी प्लॅटिनमच्या किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 25,050 आहे. त्यासोबतच 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,50,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. मौल्यवान धातूंच्या किमतीत चढउतार पाहायला मिळत असताना आज प्लॅटिनमच्या किमती देखील वाढलेल्या दिसत आहेत.