Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच! सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| दिवाळीच्या मुहूर्तावर सोने चांदीच्या दागिन्यांची सर्वात जास्त मागणी केली जाते. मात्र सध्या सोन्याचे भाव वाढल्यामुळे या मागणीत देखील घट झाली आहे. आज म्हणजेच शनिवारी सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. त्याचबरोबर, चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे आता ग्राहक या किंमती कमी होण्याची वाट बघत आहेत.

Good Returns नुसार, शनिवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची (Gold Price Today) किंमत 56,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,750 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,400 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61, 530 रुपयांनी व्यवहार करत आहे. यामुळे आता सोने लवकरच 60 च्या पुढे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Gold Price Today
(Gold Price Today)

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,400 रुपये
मुंबई – 56,400 रुपये
नागपूर – 56,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,530 रूपये
मुंबई – 61,530 रूपये
नागपूर – 61,530 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

मुख्य म्हणजे, आज चांदीच्या किमतीत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. शनिवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 753 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,530 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 75,300 रुपयांनी सुरू आहे. ज्यामुळे ग्राहकांना चांदी खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर गेले आहे.

प्लॅटिनमची किंमत

आज सोन्या-चांदीचे (Gold Price Today) भाव वाढले असले तरी प्लॅटिनमच्या किमती घसरल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,39,800 असा सुरू आहे. त्यामुळे प्लॅटिनमच्या दागिन्यांची खरेदी वाढताना दिसत आहे.