Gold Price Today: तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| तुळशी विवाह संपन्न झाला की लग्न सराईची लगबग सुरू होते. या लग्नसराईच्या कार्यक्रमांसाठी सर्वात अगोदर सोन्या-चांदीची खरेदी करण्यात येते. परंतु सध्या सोन्या चांदीच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी नाराजी झाली आहे. दिवाळी सण उलटून गेला तरी अद्याप सोन्याचे भाव उतरलेले नाहीत. त्यामुळे अशा काळात तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वात प्रथम पुढे देण्यात आलेले सोन्या-चांदीचे भाव तपासा.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे गुड रिटर्न्स आणि MCX वेबसाईट सोन्या-चांदीचे अचूक भाव सांगते. आपण या वेबसाईटनुसार आजच्या सोन्याच्या किमती पाहिला गेलो तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,100 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,290 रूपयांनी सुरू आहे. MCX वेबसाईटनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,800 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 61,970 रुपयांनी व्यवहार करत आहे.

Gold Price Today
                                                                                            Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,100 रुपये
मुंबई – 57,100 रुपये
नागपूर – 57,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,290 रूपये
मुंबई – 62,290 रूपये
नागपूर – 62,290 रुपये

Gold Price Today
                                                                                                       Gold Price Today

चांदीचे भाव

आज (शनिवारी) चांदीच्या भावात देखील किंचित वाढ झाली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 772 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच , 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,720 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 77,200 अशी आहे. त्यामुळे अशा स्थितीत सोन्या-चांदीची खरेदी करणे ग्राहकांना चांगलेच महागात पडू शकतात.

सध्या सराफ बाजारात सोन्या-चांदीची अनेक दुकाने निर्माण झाली आहेत. परंतु अशा अनेक दुकानांमधून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागिन्यांची खरेदी करण्यापूर्वी कधीही त्याची शुद्धता तपासावी. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी दागिन्यांवर असलेला हॉलमार्क पाहावे. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून आपल्याला समजते की, विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे.