Gold Price Today| सध्या सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सणासुदीच्या काळात देखील सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तर सोन्याच्या किमती दररोज बदलत आहेत. कारण आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. तर चांदीच्या किंमती देखील गगनाला भिडल्या आहेत. आज म्हणजेच बुधवारी मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्यामुळे सराफ बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
Good Returns नुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today) पाहायला गेलो तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,650 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,800 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,450 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61, 530 रुपयांनी व्यवहार करत आहे. स्थानिक पातळीवर याच किमतीने सोने व्यवहार करत आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,650 रुपये
मुंबई – 56,650 रुपये
नागपूर – 56,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,800 रूपये
मुंबई – 61,800 रूपये
नागपूर – 61,800 रुपये
चांदीचे भाव
आज चांदीच्या भावात (Gold Price Today) घसरण झालेली नाही. 10 ग्रॅम चांदीचा भाव 746 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,460 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,600 रुपयांनी सुरू आहे. यामुळे आज ग्राहकांना सोने किंवा चांदी खरेदी करणे महागात परवडू शकते.
प्लॅटिनमची किंमत
आज सोन्या चांदीच्या किमती वाढल्या असल्या तरी प्लॅटिनम च्या किमतीत घसरण झाली आहे. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,670 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,36,700 असा सुरू आहे. प्लॅटिनमच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांची प्लॅटिनमसाठीची मागणी वाढताना दिसत आहे.