Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. सोमवार ते सोन्या-चांदीचे भाव ग्राहकांच्या खिशाला परवडण्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी अगोदर सोन्याचे आजचे भाव तपासावेत. मुख्य म्हणजे, आज सोन्यासोबत चांदीचे देखील भाव वाढल्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसू शकतो.
सोमवारी गुडरिटर्न्सनुसार, सोन्याच्या किमती (Gold Price Today) शनिवारप्रमाणे स्थिर आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,950 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रुपये असाच सुरू आहे तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आजचे MCX चे आणि गुडरिटर्न्सचे भाव समान आहेत.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,950 रुपये
मुंबई – 54,950 रुपये
नागपूर – 54,950 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 59,950 रूपये
मुंबई – 59,950 रूपये
नागपूर – 59,950 रुपये
चांदीचे आजचे भाव
आज सोन्यासोबत चांदीच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. शनिवारनंतर आज चांदीच्या किमतीत कोणताही फरक पडलेला नाही. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 758 रुपयांनी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदी 75,580 रुपये भावाने विकली जात आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चांदी खरेदी करणे देखील ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर जाऊ शकते.
प्लॅटिनम किंमती
आजच्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव (Gold Price Today) वाढले असताना प्लॅटिनम च्या किमती कमी झाल्या आहेत. सोमवारी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24 हजार 560 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम प्लॅटिनम 2,45,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार होत आहेत. परिणामी प्लॅटिनमच्या किमतींमध्ये देखील फरक दिसून येत आहे.