Gold Price Today: खरेदीदारांना फटका! सोन्या चांदीच्या दरात लक्षणीय वाढ; आजचे भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| नववर्षाच्या सुरुवातीला लग्नसराईचे मुहूर्त ठरविले जातात. सध्या याचं मुहूर्तासाठी सराफ बाजारात सोने खरेदीसाठी रेलचेल दिसून येत आहे. मात्र अशास्थितीतच सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या 24 कॅरेट सोने 63 हजारांच्या वर व्यवहार करत आहे. मात्र यापूर्वी सोने 60 हजार रुपयांच्या भावात खेळत होते. आता सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे. तुम्ही जर लग्नसराईसाठी सोने खरेदी करत असाल तर आजचे भाव तपासून घ्या.

Good Return नुसार मंगळवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,710 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,400 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,710 रुपयांनी व्यवहार करत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सोन्याचे हेच दर 60 हजार रुपयांमध्ये व्यवहार करत होते. मात्र आता या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,400 रुपये
मुंबई – 58,400 रुपये
नागपूर – 58,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 63,710 रूपये
मुंबई – 63,710 रूपये
नागपूर – 63,710 रूपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

आजचे चांदीचे भाव देखील ग्राहकांना सुखावणारे नाहीत. कारण मंगळवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 795 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,950 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 79,500 अशी आहे. त्यामुळे किमती वाढल्या असताना सोन्या चांदीची खरेदी केल्यास ग्राहकांना मोठा फटका बसू शकतो.