Gold Price Today | जागतिक पातळीवर दररोज सोने – चांदीच्या भावांमध्ये फरक दिसून येत आहे. या महिन्यात सोने चांदीच्या भावाने चांगलाच उच्चांक गाठला आहे. आज म्हणजेच शनिवारी सोने-चांदीचे भाव पुन्हा वाढलेले दिसत आहेत. MCX नुसार, आज बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 61,090 रुपयांनी सुरु आहे. यातून कालनुसार आजचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे.
तर गुड रिटन्सनुसार, शनिवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,350 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,380 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे कालच्या दरानुसार 22 कॅरेट सोन्याच्या भावात 250 तर 24 कॅरेट सोन्याच्या भावात 270 रुपयांचा फरक पडला आहे. शुक्रवारनंतर सोन्याचे आजचे भाव पुन्हा वाढले आहेत.
दुसऱ्या बाजूला सोन्याबरोबर चांदीचे आजचे भाव देखील उंचावलेले दिसत आहेत. आज बाजारात चांदी 10 ग्रॅम भावासाठी 770 रुपयांनी विकली जात आहे. तर 100 ग्रॅम भावासाठी चांदी 7,700 रुपयांनी सुरू आहे. शुक्रवारी बाजारात चांदीचा दर, 10 ग्रॅम भावासाठी 764 रुपये सुरू असा सुरू होता. यामध्ये आता 6 रुपयांचा फरक दिसून येत आहे.
(Gold Price Today) गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,350 रुपये
मुंबई – 55,350 रुपये
नागपूर – 55,350 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,380 रूपये
मुंबई – 60,380 रूपये
नागपूर – 60,380 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सराफ बाजारात सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी फसवणूक केल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी यावर उपाय म्हणून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतो. या ॲपद्वारे आपण सोन्याची शुद्धता पासून त्याबाबत तक्रार देखील नोंदवू शकतो. या ॲपमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत करण्यात आलेल्या फसवणुकीवर आळा बसल्यास मदत होते.