Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ; खरेदीदारांची निराशा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | डिसेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात सतत पडझड पाहायला मिळत आहे. मात्र आता गेल्या चार पाच दिवसापासून सोन्याचे भाव कमी झाले आहेत. आज म्हणजेच शुक्रवारी देखील सोन्याचे भाव लक्षणीय किमतींनी उतरले आहेत. त्यामुळेच ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे. आज MCX आणि Good Return वेबसाईटनुसार सोन्याच्या किमती उतरलेल्या दिसत आहेत. या दोन्ही वेबसाईटवरून दररोज आपल्याला सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव जाणून घेता येतात.

शुक्रवारी गुडरिटर्न्सनुसार, सोन्याच्या किमती (Gold Price Today) कमी झाल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,650 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,530 रुपयांनी व्यवहार करत आहे. MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 53,890 रुपये असाच सुरू आहे तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,790 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज दोन्ही वेबसाईटवर सोन्या-चांदीच्या किंमती उतरल्या आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 53,650 रुपये
मुंबई – 53,650 रुपये
नागपूर – 53,650 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,530 रूपये
मुंबई – 58,530 रूपये
नागपूर – 58,530 रुपये

 

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

आज सलग तीन दिवसांपासून उतरलेलेल्या चांदीने उसळली मारली आहे. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 747 रुपयांनी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,470 रुपये भावाने विकली जात आहे. तसेच, 1000 ग्रॅम चांदी 74,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज चांदीच्या किमती वाढल्यामुळे चांदी ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेली आहे.

प्लॅटिनमची किंमत

चांदी सोबत आज प्लॅटिनमच्या किमती (Gold Price Today) देखील वाढले आहेत. शुक्रवारी, 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,370 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम प्लॅटिनम 2,43,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आज ग्राहकांनी शक्यतो चांदी आणि प्लॅटिनम खरेदी करणे टाळावे. तर सोन्याची खरेदी करावी.