Gold Price Today| नवे वर्ष सुरू झाल्यानंतर तरी सोन्या-चांदीचे भाव उतरत जातील अशी सर्वच ग्राहकांना आशा होती. आता बऱ्याच काळानंतर ग्राहकांची ही आशा खरी ठरली आहे. बुधवारी सोन्याचे भाव उतरले आहेत. तसेच चांदीच्या किमतींमध्ये देखील लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे आता सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. नव्या वर्षांमध्ये सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारी Good Return नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,500 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,820 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,500 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,820 रुपयांनी व्यवहार करत आहे. आजच्या सोन्याच्या किमती बघता यामध्ये बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसत आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,500 रुपये
मुंबई – 58,500 रुपये
नागपूर – 58,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,820 रूपये
मुंबई – 63,820 रूपये
नागपूर – 63,820 रूपये
चांदीचे भाव
आज चांदीच्या किंमतींमध्ये देखील घट झाली आहे. बुधवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 786 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,860 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 78,600 अशी आहे. त्यामुळे आता सोन्याबरोबर चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे.