Gold Price Today| गेल्या एक आठवड्यापासून विक्रमी उच्चांक गाठलेले सोन्या चांदीचे भाव आज दणक्यात आपटले आहेत. एक महिन्यानंतर सोन्या-चांदीच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना देखील दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मंगळवारी, सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल दिसून येत आहे. कारण, लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांचे टेन्शन वाढली होते. मात्र आता, सोन्या चांदीच्या किमती कमी झाल्याने दागिने खरेदीसाठी ग्राहकांना वाव मिळाला आहे.
Good Return नुसार मंगळवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,850 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,110 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,730 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,720 रुपयांनी व्यवहार करत आहे. या किमतीमुळे आपल्या लक्षात येते की रेकॉर्ड ब्रेक तेजीनंतर आज सोन्याचे भाव चांगलेच गजरले आहेत.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,850 रुपये
मुंबई – 57,850 रुपये
नागपूर – 57,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,110 रूपये
मुंबई – 63,110 रूपये
नागपूर – 63,110 रूपये
चांदीचे भाव
ग्राहकांसाठी खुशखबर म्हणजे आज चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. सराफ बाजारात, 10 ग्रॅम चांदीचा भाव 785 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,850 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 78,500 अशी आहे. या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांची खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.